Monday, May 22, 2006

poem

पहिल्या प्रेमाची गोड आठवण, अजूनही ती तशीच आहे
माझिया मनातली हळवी जागा, अजूनही ती तशीच आहे
अथांग सागर,अस्ताचा सूर्य साक्षी, अबोल तू-मी,दोन पक्षी
संध्याकाळ कोरलेली मनावर, अजूनही ती तशीच आहे
ह्रुदयी ताल, श्वासास लय, अनवट सूर, गंध सर्वदूर
रात्री फुललेली धुंद रातराणी, अजूनही ती तशीच आहे
असेल शुभ्र तुझ्यापरिस चांदणे, माहीत नसे त्यास
गाणेपौर्णिमेच्या रातीची तुझी मैफिल, अजूनही ती तशीच आहे
कितीक रात्री सरून गेल्या, दिवसही आता तसे न उरले
मनातील तिची अनावर ओढ, अजूनही ती तशीच आहे
किती आठवणी अपुऱ्या उपमा, एक अवर्णनीय प्रतिमा
केसात माळून मोगऱ्याची कळी, अजूनही ती तशीच आहे
आठवणींची पुरचुंडी बांधता, एकही राहू नये बघता
अचानक ती ओझरती दिसली, अजूनही ती तशीच आहे

No comments: