Friday, July 25, 2008

Waiting forever

’येते हं’
अजुनही ह्रुदयात गोंदली आहे तुझी नी माझी पहीली भेट
बावरलेली नजर तुझी ह्रुदयात शिरली होती थेट
मनात दाटल्या भावनांच ओठी येता झाल गाणं
ह्रुदयानी छेडल्या सुरांच मनात असच तरळत रहाणं
वाटल होत तेंव्हा तुझे हात हाती घ्यावेत
वाटल होत तेंव्हा तुझे हात मुठीत घट्ट धरावेत
मग म्हंटल जाउ दे!
नाहीच भरल हातानी मन तर ह्रुदयानी काय करावे?
माझं ह्रुदय म्हणता म्हणता उनाड पाखरु झाल
तुला भाळी आट्या बघताच पुन्हा भानावर आल
आता तुझी नजरही जरा सावरली
मीही माझी स्वप्न आवरली
तु 'येते हं' म्हणताच माझी स्वप्न बावरली!
’येते हं’ या शब्दांनी सारं आकाश भरुन गेलं
’येते हं’ या शब्दांना आज उभं तप सरुन गेलं
तु ’येते हं’ म्हणुन पुन्हा कधीच आली नाहीस
तुझी नी माझी राहीली भेट पुन्हा कधीच झाली नाही
आजुनही मनात सल आहे तुझी मला साथ नाही
मीही खुळ्या मनाला समजवतो
अरे वेड्या ... एकदा गोंदलं कधी जात नाही..

I got it in forwarded mail, and it just touched my heart, thought to share with all of you.
Why only boys have to wait forever, why girls don't say directly so we can understand................
Dont know whos is the poet. if anybody have any idea please tell me.
Name of poet is सत्यजित.
you can check his all poems at http://satyajit-m.blogspot.com/

5 comments:

यशोधरा said...

ही कविता सत्यजित यांची आहे, ते मायबोली.कॉम वर लिहितात. मायबोली.कॉम वर ही कविता पोस्ट्लेली आहे, आणि कोणीतरी तिथून चोरुन सगळीकडे पाठवलेली आहे, फक्त कवीचे नाव टाकायला अशी मंडळी सोयीस्कर रीत्या विसरतात!! तुम्हाला धन्यवाद की तुम्ही कवीच्या नावाची पृच्छा तरी केली आहे!

satyajit said...
This comment has been removed by the author.
satyajit said...

धन्यवाद यशोधरा !!
स्नेहल तुम्हाला माझ्या कविता इथे http://www.satyajit-m.blogspot.com/ वाचायला मिळतिल.

SNEHAL KENDRE said...

Thank you yashodhara.

and सत्यजित.,
i like you poems.
you are really gifted. and the way you put your thoughts in poem..i feel jealous...simply awsome

satyajit said...

thanks mitra.. tula majhya kavita avadalya ani tu majhi kavita tujhya blog var post kelis hya baddal tujhe abhar..., tumache patisasd hurup vadhavatat.